ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीला प्राधान्य द्या – मुख्यमंत्री

0

राज्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची अवस्था बिकट आहे. त्याकडे प्राधान्य लक्ष देऊन ते ठिकठाक करण्याचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेत. रस्ते सुधारण्यासाठी राष्ट्रीय आणि राज्य महामार्ग यांना जोडणाऱ्या ग्रामीण रस्त्यांचा विकास आराखडा तयार करावा, हा आराखडा तयार करतांना महत्वाच्या रस्त्यांच्या कामांची प्राथमिकता निश्चित करावी, आदेशच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना काढला आहे. मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली आज ग्रामविकास विभागाची आढावा बैठक झाली त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उद्योग मंत्री सुभाष देसाई, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, राज्यमंत्री अब्दुल सत्तार, विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार, मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे सचिव प्रविण किडे, उमेदच्या व्यवस्थापकीय संचालक आर. विमला आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here