समाजातील दुर्बल घटकांनंतर आता अंत्योदय शिधापत्रिकाधारकांनाही आयुष्मान भारत योजनेचा लाभ मिळणार आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य विभागाने पुरवठा विभागाला कार्डधारकांची यादी करण्यास सांगितले आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना पाच लाख रुपयांपर्यंत मोफत वैद्यकीय उपचार या योजनेच्या माध्यमातून करता येणार आहे. यापूर्वी या योजनेचा लाभ तीन तलाक पीडित महिलांना देण्याचेही जाहीर केले आहे. अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना योजनेचा लाभ देण्यासाठी आरोग्य विभागाने या योजनेची सुरूवात केली आहे. अंत्योदय कार्डधारकांची यादी मागण्यासाठी आरोग्य विभागाने पुरवठा विभागाला पत्र पाठविले आहे. आयुष्मान योजनेचे विवेक सरन म्हणाले की, काही अंत्योदय धारक आधीपासूनच या योजनेचा लाभ घेत आहेत. ज्या लाभार्थ्यांची नावे यादीतून वगळले आहे, अशांची नावे पुरवठा विभागाच्या यादीशी पडताळणी करण्यात येईल. पडताळणीनंतर लाभार्थ्यांची यादी सरकारकडे पाठविली जाईल. यानंतर सरकार लाभार्थ्यांना योजनेचे कार्ड देईल. यानंतर या योजनेचा लाभ लाभार्थ्यांना घेता येईल.
