वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगला पाहिजे : जतीन देसाई

0

रत्नागिरी : विज्ञानविरोधी विचार माणसाला मागे घेऊन जातो. आधुनिक काळात वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगण्याला पर्याय नाही, असे मत ज्येष्ठ पत्रकार, जागतिक घडामोडींचे अभ्यासक जतीन देसाई यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या ऑनलाइन परिसंवादात ते बोलत होते. गेली तीन वर्षे भारतातील विज्ञानवादी संघटनांतर्फे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या २० ऑगस्ट या स्मृतिदिनानिमित्त देशभर राष्ट्रीय वैज्ञानिक दृष्टिकोन दिन म्हणून कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमात श्री. देसाई म्हणाले, विज्ञानविरोधी सरकार सत्तेत असताना वैज्ञानिक विचार रुजणे अवघड होते. देशाच्या विकासासाठी वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार झाला पाहिजे. अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीने राज्यात याबाबत मोठे काम केले आहे. प्रा. विनय आर. आर. म्हणाले, शास्त्रज्ञांनी एकमेकांच्या संशोधनाला आव्हान दिले म्हणूनच नवीन शोध लागले, विज्ञानाच्या वाटचालीचा इतिहास सातत्याने सांगितला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टिकोन बाळगणे ही आपली जीवनधारा बनली पाहिजे. सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील ज्येष्ठ कार्यकर्त्या, लेखिका विनया मालती म्हणाल्या की, भांडवलशाही अर्थव्यवस्था ही छद्म विज्ञानाला पूरक ठरत आहे. शेती, पर्यावरण क्षेत्रात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा वापर केला पाहिजे. विज्ञान आणि समाजशास्त्राचा एकत्रित अभ्यास करायला हवा. सांस्कृतिक अंगाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:23 PM 25-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here