जन आशिर्वाद यात्रा २७ पासून रत्नागिरीतून सुरू : प्रमोद जठार

0

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची अधिकाऱ्यांसमवेत आढावा बैठक होऊ नये म्हणून पालकमंत्री अनिल परब यांनी डीपीडीसीची बैठक लावली. परंतु दुसऱ्यासाठी खणलेल्या खड्ड्यात स्वतः अनिल परब पडल्याचे जनतेने व्हायरल व्हिडिओतून पाहिले. याची दखल पीएमओने घेतली असून या व्हिडिओ आणि सेनेच्या शाखाप्रमुखाप्रमाणे वागणाऱ्या एसपींची सीबीआय चौकशी करण्याची भाजपने मागणी केली आहे, अशी माहिती जन आशीर्वाद यात्रेचे संयोजक प्रमोद जठार यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत दिली. द. रत्नागिरी भाजप कार्यालयात सायंकाळी उशिरा ही पत्रकार परिषद झाली. पत्रकार परिषदेला भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन, तालुका सरचिटणीस उमेश कुळकर्णी, शहराध्यक्ष सचिन करमरकर आदी उपस्थित होते. त्या वेळी श्री. जठार यांनी सांगितले की, केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा पुन्हा येत्या शुक्रवारपासून (ता. २७) रत्नागिरीतून सुरू होईल आणि सिंधुदुर्ग येथे दोन दिवस राहील. सकाळी ९ ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत श्री. राणे रत्नागिरीत यात्रा करतील. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यात २ दिवस यात्रा करून सांगता होईल, असे जठार यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
8:28 PM 25-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here