विद्यापीठातील अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण सरकारी संस्थेतच – उदय सामंत

0

अधिकारी, प्राध्यापक, प्राचार्य, कर्मचारी यांचे प्रशिक्षण पुणे येथील यशदा किंवा अध्यापकांसाठी सुरू करण्यात येणाऱ्या अध्यापक विकास संस्थेतच देण्यात यावे, असे आदेश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी येथे दिले. विधान भवनात विद्यापीठाच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भात आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या वेळी सामंत बोलत होते. फडणवीस सरकारने मुंबई विद्यापीठातील अधिकाऱ्यांना रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे मुंबई प्रशिक्षण देण्याचा निर्णय घेतला होता. या संदर्भात उदय सामंत म्हणाले, की यशदा ही शासनाची प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. विद्यापीठ आणि महाविद्यालयातील प्रशासकीय अधिकारी यांचे प्रशिक्षण या संस्थेमध्येच देण्यात यावे. राष्ट्रीय व आतंरराष्ट्रीय स्तरावर होत असलेल्या आधुनिक शिक्षण पद्धतीतील बदल लक्षात घेऊन शासनाने अध्यापक विकास संस्था स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.

IMG-20220514-WA0009


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here