मुंबई : विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींना भाजपमध्ये येण्यास कोणताही दबाव टाकला जात नाही. भाजपाच्या चांगल्या कार्यपद्धतीला पाहून सर्व नेते आमच्या गोटात दाखल होत आहे. आता बहुमताचे सर्व विक्रम मोडीत काढणार आहे, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. गरवारे क्लब येथे ‘भाजपा मेगा भरती’ कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकरराव पिचड, वैभव पिचड, शिवेंद्रराजे भोसले, चित्रा वाघ यांच्यासह कॉग्रेसचे कालिदास कोळंबकर यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गरवारे क्लब येथे झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व नेत्यांचे जंगी स्वागत केले.
