‘स्वतःची काळजी घ्या, कारण सरकार देश विक्रीत व्यस्त आहे’

0

नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी पुन्हा एकदा केंद्र सरकारवर राष्ट्रीय मालमत्ता विकल्याचा आरोप करत निशाणा साधलाय. ‘देशात कोविडची परिस्थिती “चिंताजनक” होत असताना आणि लसीकरणाची गती मंद असताना, अर्थमंत्री निर्मला सीतारामन राष्ट्रीय विमुद्रीकरण पाइपलाइनची घोषणा करण्यात व्यस्त आहेत,’असा आरोप राहुल गांधींनी केला.

“कोविडची वाढती संख्या चिंताजनक आहे. पुढच्या लाटेत गंभीर परिणाम टाळण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढवला पाहिजे. पण, भारत सरकार विक्रीत व्यस्त असल्यानं कृपया आपली काळजी घ्या.” असं त्यांनी ट्विट केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:14 PM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here