“कांचन डिजिटल”तर्फे “गणपती सजावट स्पर्धा”

0

◼️ मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजू कीर, तसेच उद्योजक प्रसन्न आंबूलकर यांचे सहकार्य

रत्नागिरी : रत्नागिरीतील प्रसिद्ध फोटो स्टुडिओ “कांचन डिजिटल”तर्फे प्रतिवर्षीप्रमाणे यंदाही “गणपती सजावट स्पर्धा” आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा मांडवी पर्यटन संस्थेचे अध्यक्ष राजीव कीर, तसेच उद्योजक प्रसन्न आंबूलकर यांच्या बहुमोल समन्वयाने पार पडणार आहे. कोंकणातील रत्नागिरीत मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. याठिकाणी गणपती मूर्तीला आकर्षक, कौशल्य, नाविन्यपूर्ण पूर्ण आरास, मखर साकारून त्यात स्थापन केले जाते. तसेच समाज प्रबोधन करणारे, धार्मिक, पौराणिक, सामाजिक देखावे करण्याची परंपरा आहे. मात्र कोरोना महामारीमुळे गेल्या दोन वर्षांपासून नागरिकांत उत्साह कमी झाला आहे आणि केवळ गणेशमूर्ती आणून स्थापन करण्याकडे कल वाढला आहे. त्यामुळे या कोरोना काळातही आपल्या बांधवांचे देखावे, आकर्षक सजावट करण्याचे कौशल्य कायम रहावे, त्यांना यात चालना मिळावी, म्हणून ही स्पर्धा भरविण्यात येत असल्याचे कांचन डिजिटलचे छायाचित्रकार कांचन मालगुंडकर यांनी यानिमित्ताने सांगितले. ही स्पर्धा रत्नागिरी तालुका मर्यादित आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गतवर्षीप्रमाणे यंदाही ही स्पर्धा ऑनलाईन घेण्यात येणार आहे. स्पर्धकांनी गणपती सजावटीचा व्हिडिओ बनवून पाठवायचा आहे. व्हिडिओचा दर्जा उत्तम हवा. व्हिडिओ पाठविण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर आहे. बनविलेला व्हिडिओ 9422576736, 9552036150 या नंबरवर पाठवायचा आहे. स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी 8999332757 या नंबरवर संपर्क साधावा. श्री गणेशाची 10 सप्टेंबर रोजी प्रतिष्ठापना झाल्यानंतर 12 रोजीपर्यंत स्पर्धकांनी व्हिडिओ पाठविणे अनिवार्य आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळून तज्ञांद्वारे स्पर्धेचे परीक्षण करण्यात येणार आहे. या स्पर्धेतून उत्कृष्ट सजावटीसाठी प्रथम, द्वितीय व तृतीय, तसेच 7 उत्तेजनार्थ पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे. विजेत्यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे. तरी रत्नागिरीकरांनी बहुसंख्येने या स्पर्धेत सहभागी होण्याचे आवाहन कांचन डिजिटलचे कांचन मालगुंडकर यांनी केले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
5:35 PM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here