सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत पोलिसांचे संचलन

0

सिंधुदुर्ग : मुख्यमंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद संपूर्ण राज्याप्रमाणे सिंधुदुर्गात देखील उमटले त्यामुळे सिंधुदुर्ग पोलीस सतर्क झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज सकाळी कणकवली शहरांमध्ये सहा अधिकारी व शेकडो पोलिसांची फौज घेऊन मुख्य चौक,महामार्ग नरडवे नाका, रेल्वे स्टेशन व पटकी देवी बाजारपेठ या ठिकाणी पोलिसांनी संचलन केले. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असणाऱ्या कणकवली शहरात कुठलाही अनुचित प्रकार, राडा घडला तरी त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलीस सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी दिला आहे. हे संचलन पोलीस उपविभागीय अधिकारी डॉ. नितीन कटेकर यांच्या नेतृत्वाखाली तर सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. कणकवली तालुक्यात सहा दंगल नियंत्रण पथक, एसआरपीएफ यांच्यासह १३५ अमलदार, ६ अधिकारी, पुणे ठाणे ग्रामीण एसआरपीएफ, पुणे तीन प्लाटून अशी शेकडो पोलिसांची फौज कणकवलीत दाखल झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:54 PM 26-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here