कंटेनरच्या धडकेत पादचारी ठार; चालकाविरोधात गुन्हा दाखल

0

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील कापडगाव येथील उतारात बेदरकारपणे कंटेनर चालवून पादचाऱ्याला धडक देत त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना मंगळवार, २४ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वा.सुमारास घडली. नितीन जानू कांबळे (३८, रा. कापडगाव बौद्धवाडी, रत्नागिरी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर उत्तम कोंडिबा क्षीरसागर (३५, रा. खैराव, ता. जत, जि. सांगली) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कंटेनर चालकाचे नाव आहे. मंगळवारी सायंकाळी उत्तम क्षीरसागर हा आपल्या ताब्यातील कंटेनर (एमएच-४६-एएफ-७५१२) घेऊन जात होता. त्याचवेळी नितीन कांबळे हे मुंबई-गोवा महामार्गावरील रोनीत हॉटेल ते कापडगाव एसटी बस स्टॉपच्यामधील उताराने चालत जात होते. त्यावेळी उत्तम चा कंटेनरवरील ताबा सुटला आणि कंटेनरची नितीनला धडक बसून अपघात झाला. यात नितीनला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा मृत्यू झाल्याने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलिस हेड काँस्टेबल कांबळे करत आहेत.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:14 PM 27-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here