नटराज नृत्यवर्गाने शंभर टक्के निकालाची परंपरा राखली कायम

0

गांधर्व महाविद्यालयांतर्फे गेल्या डिसेंबरमध्ये घेण्यात आलेल्या कथ्थक परीक्षेत येथील नटराज नृत्य वर्गाचा शंभर टक्के निकाल लागला. सलग दहा वर्षांची शंभर टक्के निकालाची परंपरा वर्गाने कायम राखली आहे. प्रारंभिक ते मध्यमा प्रथमा परीक्षेकरिता नटराज नृत्यवर्गाच्या एकूण ४९ विद्यार्थिनी बसल्या होत्या. त्यापैकी २१ विद्यार्थिनींना विशेष योग्यता श्रेणी, तर उर्वरित २८ जणींना प्रथम श्रेणी मिळाली. या विद्यार्थिनींना नृत्यशिक्षिका सोनम जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. यशस्वी विद्यार्थिनींचे त्यांनी अभिनंदन केले. मारुती मंदिर महिला मंडळ हॉल आणि टिळक आळी येथे नटराज नृत्यवर्गाचे प्रशिक्षण दिले जाते.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here