‘केंद्राच्या अर्थसंकल्पातून सामान्य शेतकऱ्याला आधार मिळेल यासाठी सोळा कलमी कार्यक्रम शेतकऱ्यांसाठी मांडण्यात आला आहे. आणि महाराष्ट्रात एक कलमी कार्यक्रम चालविला जातो आहे. महाराष्ट्रातील कर्जमाफीचा शासन निर्णय पहा कर्जमाफीच्या ‘जीआर’ मध्ये अंमलबजावणीच्या वेळेची निश्चिती नाही फक्त कर्जमाफी करणार असे म्हणणारे राज्य सरकार पाच वर्ष टीकणार नाही आणि आम्ही टिकू देणार नाही, जोपर्यंत महाराष्ट्राच्या सातबाऱ्यातून शिवसेना मुक्त होत नाही, तोपर्यंत शेतकरी कर्जमुक्त होणार नाही,’ असे वक्तव्य कामशेत येथे आमदार नितेश राणे यांनी केले आहे.
