ब्रेकिंग : जन आशीर्वाद यात्रेत चोरट्यांचा धुमाकूळ

0

◼️ भाजपा कार्यकर्त्याना चोरट्यांचा दणका

रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेने खंडित झालेल्या जन आशीर्वाद यात्रेला आज रत्नागिरीपासून सुरुवात झाली. मोठ्या दणक्यात आज भाजप कार्यकर्त्यांनी ना. नारायण राणे यांचे मारुती मंदिर येथे स्वागत केले. मात्र या स्वागताला झालेल्या कार्यकर्त्यांच्या गर्दीत चोरट्यांनी आपली हातचलाखी दाखवली आहे. या गर्दीचा फायदा उठवत चोरट्याने रत्नागिरीतील एका नगरसेवकाच्या गळ्यातील सोन्याची चेन लांबवली आहे. तर एका भाजप कार्यकर्त्याच्या गळ्यातील जाडजूड चेन कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. काही कार्यकर्त्यांची पाकिटे देखील चोरीला गेल्याचे बोलले जात आहे. इतका पोलीस बंदोबस्त व थेट प्रक्षेपण करणारे कॅमेरे असताना देखील चोरट्यांनी अनेकांच्या गळ्यातील चेन व खिशातील पाकिटांवर डल्ला मारल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
3:14 PM 27-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here