रत्नागिरी: मराठी विज्ञान परिषदेतर्फे आपल्या व्यवसायात संशोधन करून नावीन्यपूर्ण तसेच विक्रीयोग्य वस्तू किंवा प्रक्रिया अथवा सेवा देणाऱ्या लघुउद्योजकांना सु. त्रिं. तासकर पुरस्कार दिला जातो. यावर्षी पहिल्या तीन लघुउद्योजकांना पुरस्कार देण्यात येतील. अनुक्रमे ५०,०००/- रुपये, ३०,०००/- रुपये आणि २०,०००/- रुपये, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असे या तीन पुरस्कारांचे स्वरूप आहे. वार्षिक १० लाख ते ५० कोटी रुपये उलाढाल असणाऱ्या लघुउद्योजकांनी येत्या १५ फेब्रुवारी २०२० पर्यंत मराठी विज्ञान परिषद, वि. ना. पुरव मार्ग, शीव-चुनाभट्टी, मुंबई ४०००२२. दूरध्वनी (०२२) २४०५ ४७१४ / २४०५ ७२६८ येथे संपर्क साधावा किंवा office@mavipamumbai.org या ईमेलद्वारे अर्ज पाठवावेत, असे सूचित करण्यात आले आहे.
