छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या स्मारक समितीच्या अध्यक्षपदाचा शिवसंग्रामचे प्रमुख विनायक मेटे यांनी राजीनामा दिला आहे. मेटे यांनी हा राजीनामा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द केला. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाचा आढावा घेण्यासाठी सत्तेत आलेल्या सरकारला वेळ नाही. यासाठी ३ पत्रे मी सरकारकडे पाठवली, पण त्यालाही सकारात्मक उत्तर न दिल्यामुळे मी समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे मेटेंनी सांगितले.
