पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत राम मंदिर बांधण्यासाठी बुधवारी संसदेत मोठी घोषणा केली होती. त्यासाठी खास ट्रस्ट तयार करण्यात आला असून त्या ट्रस्टकडे मंदिर बांधकामाचे सर्व अधिकार देण्यात आले आहेत. यात 15 सदस्य राहणार असून त्यात एका दलित मान्यवराचाही समावेश असणार आहे. या ट्रस्टला राजधानी दिल्लीत कार्यालयासाठी जागीही देण्यात आलीय. ट्रस्टच्या स्थापनेनंतर केंद्र सरकारकडून प्रतिकात्मकरुपात ट्रस्टला 1 रुपयाची देणगी देण्यात आलीय. ट्रस्टला मिळालेली ही पहिलीच देणगी आहे.
