उसंत घेतलेला पाऊस रविवारपासून सक्रिय होण्याचा अंदाज

0

रत्नागिरी : हंगामातील तीन महिन्यांमध्ये कोकणात पावसाने सरासरी गाठली असताना रविवारपासून पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. काही भागात मात्र मोठ्या पावसाची विश्रांती आणखी काही दिवस कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणीच या काळात हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

त्यानुसार शुक्रवारी सकाळच्या सत्रात पावसाच्या हलक्या सरीं राबता सुरू होता. ऑगस्टमध्ये कोकणातील अनेक ठिकाणी पावसाचे प्रमाण कमी आहे. अनेक भागांत पावसाची सरासरी पूर्ण झालेली असून रत्नागिरी जिल्ह्यता पावसाने सुमारे सातशे मि.मी ची अतिरिक्त सरासरी गाठली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात पावसाने ९५ टक्के मजल गाठली आहे. काही दिवस पावसाने उसंत घेतली होती. मात्र रविवारपासून पावसाचे संकेत देण्यात आले आहेत. कोकणातील बहुतांश जिल्ह्यात या काळात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. काही भागांत मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होईल. शुक्रवारी कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची नोंद झाली. पुढील तीन ते चार दिवस मध्य महाराष्ट्र आणि कोकण विभागात मोठ्या पावसाची शक्यता नाही. तुरळक ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचाच पाऊस होण्याचा अंदाज आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:11 AM 28-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here