राज्य सरकारने वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटला जागा देण्याचा घेतलेला निर्णय वादात सापडलाय. राज्य सरकारने जालना जिल्ह्यात या संस्थेला 51 हेक्टर जमीन दिलीय. शरद पवार हे या संस्थेशी संबंधित असून त्यामुळेच सर्व नियम डावलून हा निर्णय घेण्यात आल्याचा आरोप भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी केलाय. ठाकरे सरकार हे शरद पवारांवर मेहेरबान झाल्याचा आरोपही त्यांनी केलाय.
