बच्चू कडूंनी महाविकास आघाडीला राजीनामा द्यावा – निलेश राणे

0

दोन लाखांची कर्जमाफी ही बुजगावणी आहे, असं म्हणत महाविकास आघाडी सरकारचे जलसंपदा मंत्री आणि लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री बच्चू कडू यांनी सरकारवर टीका केली. बच्चू कडू यांच्या या वक्तव्याचा धागा पकडत भाजप नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. बच्चू कडू…. तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकारमध्ये शोभत नाही, तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता… राजीनामा देऊन वेगळे व्हा, असा सल्ला निलेश राणे यांनी आमदार बच्चू कडू यांना दिला आहे. सरकारच्या धोरणांमुळे जे शेतकऱ्याच नुकसान झालं आहे ते अगणित आहे. त्याचा आपण अंकात विचार करू शकत नाही. तसेच माझ्या मते दोन लाखांची कर्जमाफी हे फक्त बुजगावणं आहेत. परंतु एवढ्या वर्षात शेतकऱ्यांची किती लूट झाली याचा हिशोब लावला तर सरकारकडेच शेतकऱ्यांचे किती पैसे निघतील? याचं उत्तर सरकारने द्यावं असं वक्तव्य महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये राज्यमंत्री असलेल्या बच्चू कडू यांनी केलं आहे. राज्यमंत्री बच्चू कडू आज आळंदी येथे वारकर्यांच्या कार्यक्रमानंतर माध्यमांशी बोलत होते त्यावेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक असणारे नेते अशी ओळख असलेल्या बच्चू कडू यांनी सरकारमध्ये मंत्रीपदावर असतानेच सरकारला सवाल विचारला आहे.यावर आता भाजप नेते निलेश राणे यांनी यांनी बच्चू कडू यांना या सरकार मधून बाहेर पडण्याचे आवाहन करत ठाकरे सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. बच्चू कडू तुमच्यासारखा वाघ या खोटारड्या आणि शेंबड्या ठाकरे सरकार मध्ये शोभत नाही. तुम्ही शेतकऱ्यांचा आवाज आहात मग का शेतकऱ्यांशी गद्दारी करणाऱ्या लोकांसोबत राहता ? राजीनामा देऊन वेगळे व्हा. असे आवाहन निलेश राणे यांनी केले आहे.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here