‘लसीकरण ऑफलाईनसह ऑनलाईनही व्हावे’

0

देवरूख : संगमेश्वर व देवरूख शहरातील लसीकरण ऑफलाईन (ऑन दि स्पॉट) होत आहे. त्यामुळे यासाठी पहाटेपासून रांगा लावल्या जात आहेत. यात ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग असणाऱ्या नागरिकांसाठी लसीकरणाप्रसंगी ऑफलाईन व ऑनलाईन असा पन्नास-पन्नास टक्केप्रमाणे लाभ द्यावा, अशी मागणी समविचारी मंचाचे अध्यक्ष मनोहर गुरव यांनी केली आहे. सध्या ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग यांना ऑफलाईनमुळे अडचणी येत आहेत. त्यांना पहाटे येऊन रांगा लावणे शक्य होत नाही. यामुळे त्यांचे लसीकरण करून घेण्यात अडचणी येत आहेत. त्याचप्रमाणे या नागरिकांना लसीकरणामध्ये राखीव ठेवणे तांत्रिकदृष्ट्या शक्य होणार नाही. अशा परिस्थितीत ५० टक्के ऑफलाईन व ५० टक्के ऑनलाईन लसीकरण करणे आवश्यक आहे, असे ज्येष्ठ नागरिकांचे म्हणणे आहे. याबाबत तहसीलदार, जिल्हा आरोग्य अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे, असे गुरव यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:41 PM 28-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here