नागरिकत्व दुरुस्ती कायदा भ्रम व वास्तव व्याख्यानासाठी भाजप प्रवक्ते भांडारी देवरुखात येणार

0

नागरिकत्व दुरुस्ती कायदा सीएए याबाबत अजूनही भ्रम व गैरसमज आहेत. यासाठी देवरूख येथे दि. ९ रोजी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील श्री लक्ष्मी नृसिंह मंगल कार्यालयात सायंकाळी ४ वाजता हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी हे नागरिकत्व दुरुस्ती कायदा भ्रम आणि वास्तव या विषयावर व्याख्यान देणार आहेत. उपस्थित नागरिकांबरोबरच श्री. भांडारी हे चर्चा करणार आहेत. या कार्यक्रमाचे आयोजन संगमेश्वर तालुका राष्ट्रीय विचार मंच यांनी केले आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंचाच्यावतीने करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here