केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेचा वेंगुर्लेत समारोप

0

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून काढण्यात आलेल्या जनआशीर्वाद यात्रेला मुंबईपासून सिंधुदुर्गपर्यंत सर्वच ठिकाणी जनतेचा प्रचंड प्रतिसाद लाभला. गेल्या ७ वर्षात मोदी सरकारच्या काळात राबवलेल्या विविध लोकाभिमुख योजना आणि केलेली जनहिताची कामे लोकांपर्यंत पोहोचवली. विरोधकांनी आमच्या यात्रेत अडथळे आणण्याचा प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही. कारण जनतेचे आशीर्वाद, पाठबळ हीच आमची ताकद आहे अशा शब्दात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्गवासियांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या उद्योग मंत्रालयाच्या माध्यमातून कोकणात आर्थिक समृद्धी आणून सिंधुदुर्ग राज्यात नाही तर देशात एक नंबरचा जिल्हा बनवणार अशी ग्वाही त्यांनी दिली. जनआशीर्वाद यात्रेचा समारोप रविवारी रात्री उशिरा वेंगुर्ले मानसेश्वर गार्डन येथे करण्यात आला. यावेळी सौ. निलम राणे, विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, माजी मंत्री रविंद्र चव्हाण, आ. कालिदास कोळंबकर, भाजपचे यात्राप्रमुख प्रमोद जठार, जिल्हाध्यक्ष राजन तेली, जि.प. अध्यक्षा संजना सावंत, वेंगुर्ले नगराध्यक्ष दिलीप गिरप आदी पदाधिकारी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:09 AM 30-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here