लांजा : लांजा येथे शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांसाठी रत्नागिरीतील इन्फिगो आय केअर हॉस्पिटलतर्फे आयोजित केलेल्या नेत्र तपासणी शिबिराला चांगला प्रतिसाद मिळाला. इन्फिगो हॉस्पिटल आणि लांज्यातील अल अमिन उर्दू हायस्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने नेत्र तपासणी आणि मोतिबिंदू शस्त्रक्रियेसंदर्भात तपासणी शिबिर लांज्यात झाले. शिबिराचा लाभ लांजावासीयांना घेता आला. शिबिराचे संयोजन इन्फिगोचे व्यवस्थापकीय संचाल डॉ. श्रीधर ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. अल अमिन उर्दू हायस्कूलचे चांगले सहकार्य लाभले. लांज्यासारख्या शहरी आणि ग्रामीण भागात अत्यंत गरजेची असलेली नेत्रोपचारांसंदर्भातील आरोग्य शिबिरे पार पडल्यास लांज्यातील नागरिकांची गैरसोय दूर होईल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातील आणि प्रतिष्ठित नागरिकांनी व्यक्त केला.
रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:02 PM 30-Aug-21