सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास रनप निवडणुकीत आघाडी शक्य : कुमार शेट्ये

0

रत्नागिरी : नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत सन्मानपूर्वक जागा मिळाल्यास महाविकास आघाडीच्या माध्यामतून निवडणूक लढू अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी असल्याच्या वक्तव्याचा पुनरुच्चार राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. शहरातील विविध समस्यांवर सडकून टीका करीत असताना राष्ट्रवादीने एका बाजूने आघाडीची देखील तयारी ठेवल्याचे दिसत आहे. येणारी इवदाणूक हि जेष्ठ नेते राजाभाऊ लिमये,कुमार शेट्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व मिलिंद कीर यांच्या नेतृत्वाखाली लढण्याचे राष्ट्रवादीने घोषित केले आहे. तसेच निवडणूक उमेदवार प्रक्रिया पार पाडण्याकरिता बशीर मुर्तुझा, नगरसेवक सुदेश मयेकर, मिलिंद कीर व शहराध्यक्ष निलेश भोसले यांची समिती करेल असे कुमार शेट्ये यांनी सांगितले. मागील वेळेस काहींनी मागाहून पत्रकारांना फोन करून चुकीची माहिती देत संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचा खुलासा देखील कुमार शेट्ये यांनी पत्रकार परिषदेत केला.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
05:22 PM 30/Aug/2021

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here