जाणून  घ्या कोरोना वायरस बद्दल….

0

सध्या कोणतेही वर्तमानपत्र असो वा दूरदर्शन च्या बातम्या,ठळक बातमी असते ती कोरोना वायरसबद्दल. कोरोना विषाणूंचा वाढता प्रादुर्भाव व अतिजलद प्रसार ह्यामुळे जगभरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चीनच्या ‘वुहान’ शहरात आणि  चीन देशात या कोरोना व्हायरसने तर अक्षरशःथैमान मांडले आहे. आता हा व्हायरस फ्रान्स, अमेरिका, जपान, थायलंड, आणि इंग्लंडसह अजून बऱ्याच देशात पसरत चालला आहे.  भारतामध्येही केरळमधे नुकताच  कोरोना वायरस चा एक रुग्ण आढळला आहे. या व्हायरसाची लागण खूप प्राणघातक असून ह्याचे विषाणू झपाट्याने वाढतात आणी त्याचा प्रसारसुध्हा तेवढ्याच झपाट्याने जगभरात दिसून येत आहे.ह्या विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावामुळेच जागतिक आरोग्य संघटनेने जागतिक वैद्यकीय आणीबाणीची घोषणा नुकतीच जाहिर केली आहे.
कोरोना विषाणूचे अनेक प्रकार आहेत. मात्र, यापैकी केवळ सहा प्रकारच्या विषाणूंची माणसाला बाधा होऊ शकते. मात्र, ह्या नव्या विषाणूचा शोध लागल्यानंतर कोरोना विषाणूंची संख्या आता सात झाली आहे. सध्या ज्या विषाणूंची साथ पसरली आहे त्या विषाणूला ncov असे नाव दिले गेले आहे.आत्तापर्यंत हा विषाणू मनुष्य प्राण्यात आढळला नव्हता. ह्या विषाणू ने चीन मध्ये धुमाकूळ घातला आहे.एकट्या चीनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूंचा  संसर्ग झालेल्या सुमारे ७००० रुग्णांपैकी २१३ जणांचा मृत्यू झाला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 
कोरोना विषाणूचा एक प्रकार म्हणजे सार्स. हा नवा विषाणू सार्सच्या जवळचा असल्याचं संशोधकांनी केलेल्या संशोधनात आढळून आले आहे. आजपर्यंत सार्स आजारातील कोरोना विषाणू अत्यंत घातक मानला जात होता,परंतु सार्स नावाच्या आजाराच्या कोरोना विषाणू पेक्षा हे विषाणू जास्त घातक आहेत. २००२ साली एकट्या चीनमध्ये सार्स विषाणूचा संसर्ग झाल्यापैकी ७७४ लोकांचा मृत्यू झाला होता.सार्स हा विषाणू जसा मांजरातून माणसात आला होता तसा ह्या विषाणूंच्या स्त्रोत्राबद्दल अजूनपर्यंत कोणतीही अधिकृत माहिती नसली तरी सार्स विषाणू पेक्षाही घातक असा हा विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतो अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. 
ह्यात शिंका येणे, खोकला येणे या सारखी लक्षणे  दिसतात. या व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून आले आहेत. चीन देशात मिळणाऱ्या सी फूड मधून तसेच इतर प्राणी जसे वटवाघूळ,डुक्कर व अन्य पाळीव प्राणी ह्या पासून हा विषाणू प्रसारित होत असावा अशी शक्यता आहे.ह्या विषाणूंचा प्रसार मानवामध्ये सर्दी,पडसे, खोकला झालेल्या संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आल्यामुळे होत आहे.तसेच अशा संक्रमित व्यक्तीच्या हाताला स्पर्श केल्याने त्याचा जवळ गेल्याने या विषाणूंची लगेच लागण होते. कोरोना विषाणूचा एक नवीन प्रकार असल्याने त्याच्या प्रसाराचे नेमके कारण अजूनही समजू शकलेले नाही. असे मानले जात आहे की, कोरोना व्हायरस हवा, ओलावा आणि श्वासांच्या माध्यमातून मनुष्यांमध्ये पसरतो आहे. तसेच आणखी एक कारण म्हणजे  अर्धवट शिजलेलं मांस किंवा कच्या मांसाच्या सेवनामुळे सुद्धा ह्या विषाणूंचा प्रसार होत  आहे.
सततची सर्दी, नाक गळणं, खोकला, घसा खवखवणे, डोके दुखी आणि ताप ही कोरोना विषाणूंची मुख्य लक्षणे आहेत. कमकुवत रोगप्रतिकारशक्ती असलेल्या लोकांना तसेच वयस्कर आणि लहान मुलांनासुध्हा या विषाणूची लागण सहजगत्या होते.
न्यूमोनिया, फुफ्फुसांमध्ये सूज, शिंका येणे, दमा इत्यादीही या विषाणूची लक्षणं असू शकतात.करोना विषाणूंच्या संसर्गापासुन बचाव  करायचा असेल तर खालील ऊपाय योजना करणे  महत्वाचे ठरते.
१. हात नेहेमी व वारंवार साबणाने स्वच्छ धुवावेत.
२. खोकताना किंवा शिंकताना नाकावर आणि तोडांवर रुमाल ठेवावा.
३. ज्यांना सर्दी किंवा तापाची लक्षणं असतील त्यांनी शक्यतो गर्दीत जाणे टाळावं.
४. पुर्ण शिजवलेले मांस,अंडी व इतर अन्न यांचे सेवन करावे.
५. जंगल किंवा शेतात काम करणारे, राहणाऱ्यांनी जनावरांपासून तसेच पाळीव प्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे.
६.सार्वजनिक ठिकणी तसेच रस्त्यावर थुंकणे टाळावे.
७.डॉक्टरांच्या सल्यानुसारच योग्य ते औषधोपचार करावेत.
कोरोना विषाणूवर अद्यापतरी कुठलीही लस उपलब्ध नाही.  त्यामुळेच वर सांगितल्याप्रमाणे प्रतिबंधात्मक उपाय तसेच वैयक्तीक व सार्वजनीक स्वच्छता राखली तरच ह्या भीषण अश्या विषाणूंच्या संसर्गापासून बचाव करता येईल.

HTML tutorial

डॉ.समीर जोशी
रत्नागिरी – ४१५६१२
९४२२० ५२३०३

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here