भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला, मग…; राज ठाकरे आक्रमक

0

मुंबई : राज्य सरकारकडून सणासुदीच्या काळात लादण्यात आलेल्या निर्बंधांच्या मुद्द्यावरुन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी कडाडून टीका केली. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यामध्ये आमचा काय दोष, असा जळजळीत सवाल विचारत त्यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. सध्या तुम्हाला कुठेही बघितल्यावर कोरोनाचा प्रभाव जाणवत आहे का? मग उगाच इमारती सील करण्याचा किंवा सणांवर निर्बंध लादण्याची गरज नाही. त्यामुळे राज्यात सण साजरे करण्यास आणि मंदिरे उघडण्यास परवानगी दिलीच पाहिजे, अशी भूमिका राज ठाकरे यांनी मांडली. राज ठाकरे यांनी मंगळवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केले. त्यांनी राज्य सरकारने लादलेल्या निर्बंधांवर टीकास्त्र सोडले. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. जनआशीर्वाद यात्रा झाली, त्यानंतर निदर्शने झाली. नुकताच भास्कर जाधव यांच्या मुलाने मंदिरात अभिषेक केल्याचा व्हीडिओ मी पाहिला. मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
12:18 PM 31-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here