संगमेश्वर लायन्स क्लब अध्यक्षपदी जमरत अलजी यांची फेरनिवड

0

साडवली : संगमेश्वर लायन्स क्लबच्या अध्यक्षपदी जमरत अलजी यांची फेरनिवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी व पदग्रहण सोहळा धामणी येथील हॉटेल ड्रायवीन येथे गुरुवारी पार पडला. यामध्ये जमुरत अलजी यांची अध्यक्षपदी फेरनिवड करण्यात आली. यामध्ये अध्यक्षपदी जमुरत अलजी, उपाध्यक्षपदी सतीश पटेल, सचिवपदी योगेश भिंगार्डे, सहसचिवपदी दिलीप रहाटे, खजिनदारपदी मनोहर पटेल, उपखजिनदारपदी शशिकांत पटेल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर सदस्य म्हणून विवेक शेरे, महेश उपळेकर, अमोल पाटणे, मनिष चोचे, रविकांत शिंदे, शंकर भिंगार्डे, यशवंत सैतवडेकर, गुलाम पारेख, सुशांत कोळवणकर, नेहा संसार, स्वप्निल सेतवडेकर यांची निवड करण्यात आली आहे. नूतन पदाधिकाऱ्यांना नितीन गांधी यांनी शपथ दिली. मनीष चोचे यांनी नूतन कार्यकारिणीची ओळख करून दिली. अलजी यांनी बोलताना म्हटले की, वरिष्ठांनी ज्या विश्वासाने माझ्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. तो विश्वास सार्थ ठरवण्याचा माझा प्रयत्न राहील. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोल पाटणे यांनी केले तर आभार मनोहर पटेल यांनी मानले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:27 PM 31-Aug-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here