राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत कोकण विभागात रत्नागिरी जिल्हा परिषद सर्वोत्कृष्ट

0

रत्नागिरी : महा आवास अभियान-ग्रामीण अंतर्गत उपक्रमांची यशस्वी अंमलबजावणी आणि कामगिरीबाबत मुल्यमापन करुन उत्कृष्ट काम करणाऱ्या कोकण विभागातील संस्था व व्यक्तींना महाआवास अभियान-ग्रामीण पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत कोकण विभागात सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषदेचा मान रत्नागिरी जिल्हा परिषदेला मिळाला आहे. या पुरस्काराचे वितरण कोकण भवन येथे ३ सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी २ वाजता विभागीय महसूल आयुक्त विलास पाटील यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय आवास दिनाचे औचित्य साधून २० नोव्हेंबर २०२० ते ५ जुन, २०२१ या कालावधीत महाआवास अभियान ग्रामीण भागात राबविण्यात आले होते. सर्वांसाठी घरे २०२२ या शासनाच्या धोरणांतर्गत अभियान कालावधीत विविध उपक्रम राबवून केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना, शबरी आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना, अटल बांधकाम कामगार आवास योजना, यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना या सर्व ग्रामीण गृहनिर्माण योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या कामास गतिमान करणे व गुणवत्ता आणणे हे या अभियानाचे उद्दिष्ट होते. हे अभियान कोकण विभागामध्ये यशस्वीरित्या राबविण्यात आले आहे. रत्नागिरी जिल्ह्यातही या अभियानाला उत्स्फूत प्रतिसाद मिळाला होता. कोकण विभागातील सर्व जिल्हा परिषदांकडून प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत योजनेअंतर्गत प्राप्त माहितीनुसार व शासनाने गठीत केलेल्या विभागस्तरीय समितीच्या निकषानुसार गुण विचारात घेता उच्चतम गुणवत्ता पंचायत राज संस्था पुढीलप्रमाणे आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत रत्नागिरी जिल्हा परिषदेला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तर सर्वोत्कृष्ट पंचायत समितीमध्ये दापोली पंचायत समितीला द्वितीय क्रमांक जाहीर झाला आहे. सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायतीसाठी मंडणगड तालुक्यातील उमरोली ग्रामपंचायतीला कोकणस्तरावर तृतीय क्रमांक जाहीर झाला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:18 PM 01-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here