गुटखा, पानमसाल्याच्या छुप्या विक्रेत्यांवर धाडसत्र सुरु

0

रत्नागिरी : शासनाकडून प्रतिबंधित करण्यात आलेल्या गुटखा व पानमसाल्याची छुप्या पध्दतीने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर अन्न व औषध प्रशासन कार्यालयाकडून धाडसत्र सुरु करण्यात आले आहे. दि. ३१ ऑगस्ट रोजी किर्तीनगर मजगाव रोड येथील सुनील लक्ष्मण रसाळ याच्या मालकीचे साई किराणा अॅन्ड जनरल स्टोअर या दुकानात धाड टाकून पानमसाला, सुगंधी तंबाखू असा एकूण ६ हजार ३८८ रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. तसेच दुकान सिलबंद करण्यात आले असून शहर पोलिस ठाण्यात प्रथम खबरी अहवाल (एफआयआर) नोंदवण्यात आला आहे. ही कारवाई रत्नागिरीचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त संजय नारागुडे यांच्या नेतृत्वाखाली अन्न व सुरक्षा अधिकारी प्रशांत गुंजाळ व दशरथ कांबळे यांनी केली. अन्न व औषध प्रशासन (म.राज्य) मुंबईचे आयुक्त परिमल सिंह यांच्या निर्देशानुसार यापुढेही प्रतिबंधित विक्रेत्यावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात येणार असल्याचे कळवण्यात आले आहे. या बाबत काही माहिती असल्यास जनतेने रत्नागिरी कार्यालयाचा भ्रमणध्वनी ८०५५४३६१८८ किंवा १८००-२२३६५ या टोलफ्री क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:26 PM 01-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here