दुष्काळग्रस्त मराठवाड्याला कोकणाचे पाणी

0

मुंबई : पश्चिम वाहिनी नदी खोर्‍यातून मराठवाड्यासाठी पाणी वळविण्यासाठी आखण्यात आलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पाला मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाने तत्त्वत: मान्यता दिली. कोकणातून वाहून जाणारे पाणी गोदावरी खोर्‍यात आणण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे मराठवाड्याला 25.60 अब्ज घनफूट पाणी मराठवाड्याला मिळणार आहे. आंतरराज्यीय दमणगंगा-पिंजाळ नदीजोड प्रकल्प व राज्यांतर्गत नार-पार-गिरणा, पार गोदावरी, दमणगंगा-वैतरणा-गोदावरी व दमणगंगा-एकदरे-गोदावरी हे नदीजोड प्रकल्प राष्ट्रीय प्रकल्प म्हणून न घेता राज्यांतर्गत प्रकल्प म्हणून राज्याच्या निधीतून त्वरित हाती घेण्यात यावेत, असा प्रस्ताव जलसंपदा विभागाने मांडला.  या नदीजोड प्रकल्पांमुळे मुंबई शहरासाठी 31.60 अब्ज घनफूट, गोदावरी खोर्‍यातील मराठवाडा भागात 25.60 अब्ज घनफूट व तापी खोर्‍यासाठी 10.76 अब्ज घनफूट पाणी कोकणातून उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here