भाजप महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

0

रत्नागिरी: वर्धा आणि औरंगाबाद येथील महिलांवर अत्याचाराच्या घटना घडल्या. महिलांवरील हल्ले, जाळपोळीच्या लाजिरवाण्या घटनांमुळे असे अत्याचार करणार्‍या प्रवृत्तींना कठोर शासन झाले पाहिजे. त्याकरिता कठोर शिक्षेची तरतूद असलेल्या दिशा कायद्याच्या धरतीवर महाराष्ट्रातही कायदा करण्यात यावा, अशी मागणी भाजपच्या शहर महिला मोर्चातर्फे जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. या वेळी भाजप महिला मोर्चा शहराध्यक्ष सौ. राजश्री शिवलकर, सौ. ऐश्वर्या जठार, नगरसेविका सौ. मानसी करमरकर, सौ. प्रणाली रायकर, सौ. सुप्रिया रसाळ, सौ. सायली बेर्डे, पमू पाटील, वेदिका गवाणकर तसेच भाजयुमो शहराध्यक्ष विक्रम जैन, संदीप सुर्वे आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे, वंदनीय जिजाऊ, राणी लक्ष्मीबाई, सावित्रीबाई फुले अशा झुंजार पराक्रमी महिलांची महाराष्ट्राला परंपरा आहे. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून महाराष्ट्रातील महिला रोज नवनवीन यशाची क्षितीचे पादाक्रांत करत आहेत. मात्र सध्या राज्यात महिलांवर अत्याचाराच्या दुर्दैवी घटना घडत आहेत. बेटी बचाओ, बेटी पढाओ हा नारा देत महिलांना सुशिक्षित केले पण सुरक्षित करू शकलो नाही, ही व्यथा आहे. अत्याचार करणार्‍या प्रवृत्तींना कठोर शासन झाले पाहिजे.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here