श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर खेड तालुक्यात ५ सप्टेंबरला दरडग्रस्त धनगरवाड्यांची पाहणी करणार

0

रत्नागिरी : श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर येत्या ५ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यातील दरडग्रस्त धनगरवाड्यांची पाहणी करणार आहेत. खेड तालुक्यातील धनगरवाड्या सह्याद्री पर्वताच्या दुर्गम भागात वसलेल्या असून स्वातंत्र्यानंतरही विकासाच्या मूलभूत सुविधांपासून त्या अजून वंचित आहेत. गेल्या २१ आणि २२ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीत अनेक धनगरवाड्यांवर दरडी कोसळून धनगर बांधवांच्या घरांचे आणि शेतीचे नुकसान झाले. अनेक धनगर बांधव बेसहारा झाले आहेत. धनगर समाज बांधवांच्या या आणि इतर अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करून समाज बांधवांना आधार देण्याच्या दृष्टीने धनगर समाजाचे आराध्य दैवत राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या परिवाराचे तेरावे वंशज श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर येत्या रविवारी, ५ सप्टेंबर रोजी खेड तालुक्यात येत आहेत. यावेळी ते लोटे/गुणदे – तलारीवाडी, मिर्ले – धनगरवाडी, खोपी – अवकिरेवाडी, खोपी – रामजीवाडी, आंबवली – बाऊलवाडी, सणघर – धनगरवाडी, वाडीबीड – धनगरवाडी या वाड्यावस्त्यांना भेटी देऊन समाजबांधवांशी संवाद साधणार आहेत. श्रीमंत भूषणसिंगराजे होळकर यांच्या दौऱ्याचे नियोजन रत्नागिरीच्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचातर्फे करण्यात आले आहे. होळकर यांचे प्रथमच खेड तालुक्यात आगमन होत असल्याने समाज बांधव त्यांच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत, अशी माहिती मंचाचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिली.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:07 AM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here