राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार डॉ. चंदन मित्रा यांचं निधन

0

राज्यसभेचे माजी खासदार आणि पत्रकार डॉ. चंदन मित्रा यांचं काल रात्री दिल्लीत निधन झालं. त्यांचा मुलगा कुशान मित्रानं यासंदर्भात माहिती दिली. मित्रा यांनी द पायोनियरचे संपादक म्हणूनही काम पाहिलं आहे. चंदन मित्रा भाजपच्या कोट्यातून राज्यसभेत पोहोचले होते. परंतु, 2018 मध्ये त्यांनी भाजपची साथ सोडत ममता बॅनर्जींचा पक्ष तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. डॉ. चंदन मित्रा यांच्या निधनानंतर अनेक नेत्यांनी दुःख व्यक्त केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:52 AM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here