शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चाची आज राज्यभर धरणं आंदोलन

0

पुणे : मराठा आरक्षण व समाजाच्या इतर मागण्यांसाठी पुणे जिल्हा शिवसंग्राम संघटना आणि मराठा क्रांती संघर्ष मोर्चा यांचे वतीने २ सप्टेंबर रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. एकूण १७ मागण्यांचे निवेदन आम्ही जिल्हाधिकारी यांच्यामार्फत सरकारला देणार आहोत, अशी माहिती शिवसंग्राम संघटनेचे प्रदेश प्रवक्ते तुषार काकडे यांनी दिली. शिवसंग्रामचे प्रदेश सचिव शेखर पवार, शहराध्यक्ष भरत लगड युवकाध्यक्ष नितीन ननावरे, शहर उपाध्यक्ष बाळासाहेब चव्हाण, सामाजिक न्याय विभागाचे शहराध्यक्ष विनोद शिंदे, कल्याणराव अडागळे यावेळी उपस्थित होते. सर्वोच्च न्यायालयात समाजाची बाजू समर्थपणे मांडण्यात राज्य सरकार सपशेल नाकाम ठरले अशी सार्वत्रिक भावना आहे. याला जबाबदार, राज्य मंत्रिमंडळाच्या मराठा विषयक उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हेच असल्याने त्यांची तातडीने उपसमितीवरून हकालपट्टी करावी. ही प्रमुख मागणी या धरणे आंदोलनात करणार असल्याचे तुषार काकडे यांनी सांगितले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:00 AM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here