सायरा बानो यांची लवकरच होणार अँजिओग्राफी

0

मुंबई : दिवंगत अभिनेते दिलीप कुमार यांच्या पत्नी आणि अभिनेत्री सायरा बानो गेल्या चार दिवसांपासून रुग्णालयात दाखल आहेत. त्यांच्यावर हिंदुजा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. श्वास घेण्यास अडचण आणि छातीत दुखत असल्याच्या तक्रारीनंतर त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तूर्तास सायरा यांच्या उपचार करणारे डॉ. नितीन गोखले यांनी त्यांच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आहे. वृत्तानुसार, सायरा बानो यांचा लेफ्ट वेंट्रिकुलर निकामी झाल्याचं कळतंय. त्यामुळे लवकरच त्यांच्यावर अँजिओग्राफी केली जाणार आहे. तथापि सायरा यांच्या प्रकृतीत सुधार होतोय. आज त्यांना आयसीयूमधून नॉर्मल वार्डात शिफ्ट केलं जाणार आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:23 AM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here