अमरकोश पठण स्पर्धेत आगाशे शाळेचे घवघवीत यश

0

रत्नागिरी: अमरकोश पठण स्पर्धेत येथील कृ. चिं. आगाशे शाळेतील विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले. पहिली ते चौथीतील 11 विद्यार्थ्यांनी प्रथम ते तृतीय क्रमांक पटकावले. यशस्वी विद्यार्थी असे: इयत्ता पहिली- प्रथम खुशी केळकर, तृतीय सार्थक पटवर्धन, तृतीय सानवी बेहेरे, इयत्ता दुसरी- प्रथम- विदुला मुळ्ये व रमा कानविंदे, द्वितीय सानवी दामले, तृतीय वेदांत गोसावी, नरहरी भावे, इयत्ता तिसरी- द्वितीय आदित्य दामले, तृतीय ईशा वायंगणकर, इयत्ता चौथी- प्रथम शर्वाणी मुळ्ये, तृतीय तीर्था मयेकर, उत्तेजनार्थ सृष्टी रेवाळे. या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. याबद्दल विद्यार्थी व शिक्षकांचे अभिनंदन भारत शिक्षण मंडळाचे अध्यक्ष नंदकुमार साळवी, कार्यवाह सुनील वणजू, मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांनी केले.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here