मी प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे. मी रत्नागिरी तालुक्यात वाचन वृद्धिंगत होण्यासाठी एक उपक्रम राबविला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून तालुक्यातील सांडेलावगण, कांबळेलावगण, चाफे, जाकादेवी, खालगाव, कापडगाव या गावातील ग्रामीण भागात वाड्यावाड्यांवर फिरते वाचनालय चालू केले आहे. हे वाचनालय १० वाड्यांत अतिशय उत्तमप्रकारे चालू आहे. सध्या या वाचनालयाचा ३५७ इतका वाचक सभासद वर्ग आहे. सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेकजण हे पुस्तकांच्या वाचनापासून दुरावत चालले आहे. त्यासोबतच लहान मुलांना शाळेच्या अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही पुस्तके वाचून त्यांच्या ज्ञानात भर पडावी हा उद्देश आहेच, सोबत मुलांनी वाचनाकडे वळावे, यासाठी हा प्रयत्न आहे. आपण पुस्तकप्रेमी, लेखनप्रेमी आणि वाचनप्रेमी आहातच. म्हणूनच आपल्याला या उपक्रमाची जाणिव योग्य प्रकारे होईल, यासाठी आपल्याला हा संदेश मी पाठवित आहे. आपण आम्हांला पुस्तकरुपी मदत केलात तर खूप बरे होईल. आम्हाला हा उपक्रम मोठ्या प्रमाणात वाढवता येईल. त्यासाठी तुम्ही स्वतः लिहिलेली पुस्तके किंवा आपल्याकडील संग्रहित पुस्तके यापैकी किमान १ आणि जास्तीत जास्त कितीही पुस्तके आपण नाव- प्रसाद सुजाता सुरेश पाष्टे, मु. सांडेलावगण, पोस्ट – जयगड, ता. जि. रत्नागिरी. ४१५६१४, संपर्क क्रमांक – ८८८८९१०९९८. या पत्त्यावर पाठवू शकता. आपल्याला ही नम्रतापूर्वक विनंती आहे. सोबतच आपण मला आपला पोस्ट पत्ता पाठवावा, यावर आपल्याला आपण दिलेल्या देणगीची पावती आणि आभार पत्र पाठविले जाईल.
