युवा सेनेतर्फे घरगुती गणपती सजावट स्पर्धा

0

खेड : युवा सेनेच्या वतीने आमदार भास्कर जाधव आणि आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेना जिल्हा अधिकारी अजिंक्य मोरे यांच्या संकल्पनेतून दि. १० ते २५ सप्टेंबर या कालावधीत घरगुती गणपती सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आपल्या घरातील गणपती सजावटीचे
फोटो, नाव व पत्ता यांच्यासह सिद्धेश खेडेकर, दर्शन महाजन, राकेश सागवेकर, प्रसाद पाटणे, सौरभ चाळके यांच्याकडे नाव नोंदणी करावी. फोटो व माहिती दि.१८ पर्यंत पोहोचतील, असे पहावे. विजेत्यांना अनुक्रमे ५ हजार १ रुपये, ३ हजार १ रुपये व २ हजार १ रुपये सन्मान चिन्हासोबत देण्यात येणार आहे. या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन युवा सेनेतर्फे करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:04 PM 02-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here