रत्नागिरी शहर टपऱ्यांचे शहर : माजी नगराध्यक्ष मिलिंद किर

0

अनधिकृत टपऱ्यांमुळे रत्नागिरी शहर बकाल होत चालले आहे. हे टपऱ्यांचे शहर आहे काय ? असा सवाल करत अनधिकृत टपऱ्यांवर कारवाई करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे करण्यात आली आहे. शहरातील साळवी स्टॉप परिसरात साळवी स्टॉप ते मिऱ्या रोड दरम्यान हॉटेल सफारी एशियाच्या मागील बाजूस मोठ्या प्रमाणात अनधिकृत व्यवसायिक गाळे उभे करण्याचे काम सुरू असून या बांधकामाला नेमका वरदहस्त कोणाचा असा प्रश्न राष्ट्रवादी च्या शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांना केला आहे. राम आळी परिसरात वाहतुकीची समस्या भेडसावत आहे. परप्रांतीय हातगाडी व्यवसायिकांमुळे ही समस्या निर्माण होत असून कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे. यावेळी माजी नगराध्यक्ष मिलिंद किर, निलेश भोसले, मनू गुरव, अनिकेत पवार, सचिन लांजेकर आदी उपस्थित होते.

HTML tutorial

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here