आंगणेवाडीच्या यात्रेच्या विकासकामांसाठी 13.5 कोटींच्या कामाला मंजुरी – उदय सामंत

0

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथे होणाऱ्या यात्रेच्या अनुषंगाने विकासकामांना गती देण्यासाठी 13.5 कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली. सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात आंगणेवाडी येथे यात्रेसाठी मोठ्या प्रमाणात भाविक उपस्थित राहतात. येणाऱ्या भाविकांना उत्तम सुविधा मिळाव्यात यासाठी या मार्गावरील काही रस्त्यांची तात्काळ दुरुस्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here