हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतिक म्हणून प्रसिद्ध असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील, तालुका रत्नागिरीतील, मौजे हातिस येथील श्री पिर बाबरशेख औलिया बाबांचा उरुस (जत्रा) रितीरिवाजानुसार शनिवार दि.०८/०२/२०२० रोजी रात्री आणि रविवार दिनांक ०९/०२/२०२० रोजी दिवसा मोठ्या उत्साहात आणि थाटात साजरा होणार आहे. रत्नागिरी तालुक्यातील हातीस येथे सुरू होणाऱ्या पीर बाबरशेख उरूस निमित्ताने एसटी महामंडळातर्फे जादा बसेसची सुविधा देण्यात येणार आहेत. या सुविधा 8 ते 10 फेब्रुवारी रोजी पीर बाबरशेख उरूस यात्रा स्पेशल निमित्ताने मध्यवर्ती स्थानकामधून या बसेस सोडण्यात येणार आहेत. सध्या या स्थानकाचे काम प्रगतीपथावर असून स्थानकाच्या बाजूला मोकळ्या जागेत यात्रा स्पेशल गाड्या सोडण्यात येणार आहेत.
