पोलिसाला ठार मारण्याची धमकी देणाऱ्याला १ वर्षे कैद आणि १० हजार दंडाची शिक्षा

0

हातभट्टीवर छापा टाकायला गेलेल्या पोलिसाला दमदाटी करून ठार मारण्याची धमकी देत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी एका १ वर्ष साधी कैद व १० हजार रुपये दंड अशी शिक्षा न्यायालयाने सुनावली.ही घटना संगमेश्वर तालुक्यातील तुळसणी गावी ७ नोव्हेंबर२०११ रोजी घडली होती. संगमेश्वर तालुक्यातील तुळणी गावात हातभट्टी लावून दारू पाडत असल्याची माहिती गावच्या तंटा मुक्ती समितीच्या सदस्यांनी देवरुख पोलिसांना दिली होती. या हातभट्टीवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्याविरोधात देवरुख पोलिस स्थानकाचे पोहेकॉ शरद यशवंत ओगले हे कारवाई करण्यासाठी तुळसणी येथे गेले होते.त्यांच्यासोबत गावचे पोलीस पाटील, तंटा मुक्ती समितीचे सदस्य आदी गावातील मंडळी होती. कारवाई करण्यासाठी चंद्रकांत सीताराम लाड (वय-५४,रा.तुळसनणी) यांच्या घरी छापा मारण्यासाठी गेले असता चंद्रकांत लाड हातात लाकडी बांबू घेऊन बाहेर धावत आले.तू स्वतःला समजतोस काय? तुला आता दाखवतोच असे बोलून सरकारी कामात अडथळा आणला होता. याप्रकरणी पोहेकॉ शरद यशवंत ओगले यांनी देवरुख पोलीस स्थानकात तक्रार दिली होती.या तक्रारीवरून पोलिसांनी चंद्रकांत सीताराम लाड यांचे विरोधात भा.द.वि.क ३५३,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला होता. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असतानाच त्यावर अंतिम सुनावणी होऊन न्यायालयाने चंद्रकांत लाड यांना दोषी ठरवून १ वर्ष साधी कैद व १० हजार रुपये दंड, दंड न भरल्यास २ महिने साधी कैद अशी शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे सहाय्यक सरकारी वकील प्रफुल्ल साळवी यांनी काम पाहिले.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here