टोकियो पॅरालिम्पिक: प्रवीण कुमारनं उंच उडीत जिंकलं रौप्यपदक

0

टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंकडून पदकांची लयलूट सुरू असून उंच उडीत भारताच्या खात्यात आणखी एक पदक जमा झालं आहे. नोएडाच्या १८ वर्षीय प्रवीण कुमार यानं उंच उडीत टी-४४ गटात २ मीटर उंच उडी घेत रौप्य पदकाची कमाई केली आहे. ग्रेट ब्रिटनच्या ब्रूम-एडवर्ड्स जोनाथन यानं २.१० मीटर उडी घेत सुवर्णपदक कमावलं. तर कांस्य पदकावर पोलंडच्या लेपियाटो मासिएजो यानं नाव कोरलं आहे.

टोकियोत सुरू असलेल्या पॅरालिम्पिकमध्ये उंच उडीत भारतासाठी हे चौथं पदक ठरलं आहे. याआधी उंच उडीत टी-६३ गटात भारताच्या मरियप्पन थंगावेलु यानंही रौप्य पदकाची कमाई केली. तर शरद कुमार यानं कांस्य पदकाची कमाई केली होती. निषाद कुमार यानं टी-४७ गटात नवा आशियाई रेकॉर्ड प्रस्थापित करत रौप्य पदक जिंकलं आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
10:10 AM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here