फोटो काढण्यासाठी तरुणाच्या गळ्यातील सोन्याची सुमारे 98 हजार रुपयांची चेन मागून घेत परत न केल्याप्रकरणातील संशयित तरुणाला न्यायालयाने दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.ही घटना 25 जानेवारी रोजी दुपारी 12 वा.सुमारास भाट्ये चेकपोस्ट चौकीजवळ घडली होती. अक्षय राम लिंगायत (23,रा.भाट्ये,रत्नागिरी) असे पोलिस कोठडी सुनावण्यात आलेल्या संशयिताचे नाव आहे. त्याच्याविरोधात साई निलेश राजवाडकर (17,रा.भाट्ये,रत्नागिरी) याने शुक्रवार 31 जानेवारी रोजी शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती. त्यानुसार,25 जानेवारी रोजी साई राजवाडकर हा कॉलेजला जात होता. त्यावेळी भाट्ये चेकपोस्ट चौकीजवळ त्याच्याच गावातील व ओळखीच्या अक्षय लिंगायतने फोटो काढण्यासाठी साईकडे गळ्यातील सोन्याची चेन मागितली. तेव्हा साईने विश्वासाने अक्षयकडे चेन दिली. चेन घेउन अक्षय निघून गेल्याने साईने अक्षयची आई व आजीकडे चौकशी केली. परंतू त्यांनी आम्हाला माहित नसल्याचे साईला सांगताच त्याने शहर पोलिसांकडे तक्रार दिली होती.
