राहुरी – तालुक्यातील सात्रळ येथील कडू वस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील श्रेया गोरक्षनाथ सजन हिने जिल्हा परिषदेतील हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवला. सुंदर हस्ताक्षर म्हणजे मोत्याचा दागिना आणि हा दागिना काय कमाल करु शकतो, याचा अनुभव श्रेया सजन सध्या घेत आहे. तिचे हस्ताक्षर व त्याच्या व्हिडिओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. एकाच दिवसात श्रेयाचे नाव थेट अमेरिकेतही जाऊन पोहोचले. ती लिहीत असतानाचा व्हिडिओ अमेरिकेतील रोहित काळे यांनी पहिला आणि थेट अमेरिकेहून त्यांनी श्रेयाशी संपर्क साधून तिला कॅंलोग्राफी पेनचा संच बक्षीस देऊ केले आहेत.
