‘मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक’ : राहुल गांधी

0

नरेंद्र मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे कारण ते लोकांच्या नोकऱ्या हिसकावण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप काँग्रेसचे माजी अध्यक्ष नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केला. ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’च्या अहवालाचा हवाला देत त्यांनी ट्विट करून पुन्हा एकादा मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. “मोदी सरकार रोजगारासाठी हानिकारक आहे. ते कोणत्याही प्रकारच्या व्यवसायाला किंवा नोकरीला प्रोत्साहन देत नाहीत, परंतु ज्यांच्याकडे नोकऱ्या आहेत त्यांच्याकडून त्या हिसकावून घेत आहेत. देशवासियांकडून अत्मनिर्भरतेचे ढोंग अपेक्षित आहे. जनहितासाठी जारी केले.

दरम्यान, सीएमआयआयने जारी केलेल्या अहवालात असे म्हटले की, ऑगस्ट महिन्यात १५ लाखांहून अधिक लोक बेरोजगार झाले आहेत. यापूर्वी राहुल गांधींनीही महागाईबाबत मोदी सरकारवर हल्लाबोल केला होता. मोदी सरकारसाठी, जीडीपीमध्ये वाढ म्हणजे गॅस, डिझेल आणि पेट्रोलच्या किंमतीत वाढ. जीडीपी वाढत आहे असे मोदीजी सांगत राहतात, अर्थमंत्री म्हणतात की जीडीपी वाढत आहे. मोदी सरकारचं जीडीपी म्हणजे काय तर याचा अर्थ ‘गॅस-डिझेल-पेट्रोल’ असेही त्यांनी म्हटले आहे.

पेट्रोल, डिझेल आणि गॅसचे दरवाढ झाल्यावर राहुल गांधी असेही म्हणाले, पेट्रोल आणि डिझेलला अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक भागात कुठेतरी इनपुट आहे. जेव्हा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढतात, तेव्हा प्रत्यक्ष इजा होते आणि अप्रत्यक्ष इजा होते. २०१४ मध्ये यूपीएने सोडले तेव्हा एलपीजी सिलेंडरची किंमत ४१० रुपये प्रति सिलेंडर होती. आज त्याची किंमत ८८५ रुपये प्रति सिलेंडर आहे म्हणजेच यामध्ये ११६ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तर २०१४ मध्ये पेट्रोल ७१.५ रुपये प्रति लिटर होते, आज ते १०१ रुपये प्रति लिटर आहे यामध्ये ४२ टक्क्यांनी वाढ झाली आहे तर २०१४ मध्ये डिझेलची किंमत ५७ रुपये प्रति लीटर होती, आज ती ८८ रुपये प्रति लीटर आहे, असे सांगून राहुल गांधींनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
4:28 PM 03-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here