काय…. दिल्लीप्रमाणे आता महाराष्ट्रातही मोफत वीज मिळण्याची शक्यता

0

राज्यात विजेचा दरमहा 100 युनिटपर्यंत वापर करणाऱ्या ग्राहकांना मोफत वीज देण्याच्या निर्णयावर राज्य सरकार विचार करत असल्याची माहिती ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी दिली आहे. त्यामुळे दिल्लीप्रमाणे महाराष्ट्रातही मोफत विज मिळण्याची शक्यता आहे. दिल्लीमध्ये अरविंद केजरीवाल सरकारतर्फे 200 युनिटपर्यंत विज मोफत दिली जाते. त्याचाच आदर्श घेत राज्यात 200 युनिटपर्यंत वीज मोफत देण्याचा विचार आहे. मात्र, सध्या 100 युनिटपर्यंत विज या वर्षाच्या शेवटपर्यंत ग्राहकांना दिली जावी यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here