मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विश्वासू मानले जाणारे आमदार रविंद्र वायकर यांच्यावर ‘सीएमओ’ अर्थात मुख्यमंत्री कार्यालयाची जबाबदारी येणार आहे. सीएमओ कार्यालयाचे समन्वयक म्हणून शिवसेना आमदार वायकर यांची निवड करण्यात आली आहे. पुढील काही दिवसांतच त्यांच्या नियुक्तीचा आदेश निघणार आहे.
