‘त्या’ शिक्षकाला जामीन मंजूर

0

रत्नागिरी : सहा वर्षांपूर्वी एका १६ वर्षीय मुलावर भगवती बंदर येथे अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या शिक्षकाला मुंबई उच्च न्यायालयाने २५ हजार रुपयांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. ही घटना २९ ऑगस्ट २०१५ रोजी घडली होती. शैलेश जाधव असे जामिनावर मुक्त करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने पीडित १६ वर्षीय मुलाबरोबर ओळख वाढवून त्याला चायनीज खाण्याचे आमिष दाखवून भगवती बंदर येथील डोंगरावर नेले होते. त्यानंतर त्या मुलावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करून याबाबत कोठेही वाच्यता केल्यास जीवे ठार मारण्याची धमकीही दिली होती. याबाबत शहर पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. त्यानंतर रत्नागिरीतील विशेष सत्र न्यायाधीशांकडे हा खटला चालला असताना या खटल्यासंदर्भात वैद्यकीय अधिकारी तसेच पीडित याचा जबाब यांचा विचार केल्यावर विशेष सत्र न्यायालयाने आरोपी शैलेश जाधव याला १७ फेब्रुवारी २०२० रोजी ७ वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली होती. या निर्णयाविरोधात आरोपी शैलेश जाधवने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते. फेब्रुवारी २०२० पासून हा आरोपी रत्नागिरी कारागृहात होता. या अपिलावरती मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली असता मुंबई उच्च न्यायालयाने आरोपी शैलेश जाधवला २५ हजारांच्या जामिनावर मुक्त करण्याचे आदेश दिले. शैलेश जाधवच्या वतीने अॅड. राकेश भाटकर यांनी मुंबई उच्च न्यायालयात काम पाहिले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:58 AM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here