स्वत:ला कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या नारायण राणेंना…; सुभाष देसाईंची बोचरी टीका

0

अहमदनगर : ‘स्वत:ला कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना त्याच कोकणातील एका गावात सरकारने दणका दिला. जेव्हा राणेंना अटक होत होती, तेव्हा भाजपचा एकही मोठा नेता त्यांच्या मदतीसाठी पुढे आला नाही. जे आले ते सगळे सटरफटर कार्यकर्ते होते’, असे म्हणत उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी राणे यांना पुन्हा डिवचले आहे. औरंगाबादहून परतताना सुभाष देसाई हे नगर जिल्ह्यातील नेवासा तालुक्यात थांबले होते. जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमास आणि शिवसंवाद उपक्रमात ते बोलत होते. यावेळी त्यांनी राणे यांचा विषय काढून त्यांच्यावर टीका केली. तसेच त्यांच्यावर झालेल्या अटकेच्या कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांचे कौतुकही केले. देसाई म्हणाले, ‘भाजपच्या केंद्रीय मंत्र्याला कोकणातील एकाही गावात शिवसेनेला रोखणे शक्य झाले नाही. उलट कोकणसम्राट म्हणवून घेणाऱ्या राणेंना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अटक करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शोभेसे काम करून दाखविले. ‘सौ सोनारकी एक लोहार की’ दाखवत राणेंना अटक करण्यात आली. त्यावेळी सटरफटर कार्यकर्ते सोडले तर भाजपचा एकही मोठा नेता त्यांना वाचवायला पुढे आला नाही. कोकणातील एका तालुक्याच्या गावात राणेंची बत्ती गुल करीत अटक करण्यात आली,’ असेही देसाई म्हणाले.

रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:42 PM 04-Sep-21

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here